निर्मल ग्राम पाटोदा /गंगापुर नेहरी
ता.जि.औरंगाबाद
नाविन्यपूर्ण उपक्रम
1)ग्रामपंचायत कराचा 100% भरणा करणाऱ्या खातेदारास वर्षभर मोफत दळण व २० ली R/O पाणी मोफत.
2)ग्रामपंचायत कडून शुद्ध पाणीपुरवठा 24 तास 365 दिवस व मीटरने पाणी पुरवठा.
3)प्रत्येक नागरिकांचा वाढदिवस ग्रामपंचायत मार्फत साजरा करण्यात येतो .
4)प्रत्येक महिन्यातील एका शनिवारी गावात दक्षिण मुखी मारुतीचा भंडारा व समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येतो.
5)गांवात गणपती उत्सवात एक गांव एक गणपती उपक्रम राबववण्यात येतो.
6)गावातील कचरा रोज ट्रॅक्टरव्दारे उचलुन त्यापासुन घनकचरा व्यवस्थापन /कंपोस्ट खत निर्मिती केली जाते.
7)लोकसहभागातुन समाज प्रबोधन, सामाजिक जागृती केली जाते.
8)संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने प्रशासकीय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामपंचायती कडुन पुरस्कार व सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात येतो.
9) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी वाटप
10)प्रत्येक घराला स्वतंर दोन कचरा कुंड्या (ओला कचरा/ सुका कचरा).
11) (42 नग) CCTV CAMERA जि.प.शाळा , ग्रामपंचायत , अंगणवाडी,सार्वजनिक गांवाला जोडणारे रस्ते येथे बसविण्यात आले .
12) गावात सार्वजनिक ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आले .
13)णवाडीतील मुलांना बसण्यासाठी फर्निचर व्यवस्था व कुपोषण मुक्त अंगणवाडी.
14) गावातील नागरीकांना शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठ्या करीता कै.बालचंद पेरे जल शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
15) संपर्कासाठी पदाधिकरी , अधिकारी , कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड सुविधा.
16) डायरेक्ट कुकींग सिस्टीम व्दारे अंगणवाडी मुलांना पोषण आहाराची व्यवस्था.
17) पर्यावरण ग्रामसमृध्दी योजनेत लोकसंख्येच्या दुप्पट फळ झाडाची लागवड.
18)नियमित हात धुवा मोहिमे अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वॉश बेसिंनची व्यवस्था.
19) वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सिमेंट खुर्च्यांची व्यवस्था
20) सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत स्थिरीकरण तलाव व पुनर्वापर प्रकल्प.
21) श्रीमती जानकी देवी बजाज संस्था मार्फत जि.प.प्रा.शाळा पाटोदा येथे ई.लर्निंग प्रोजेक्ट
22) गांवातील नागरिकांना सार्वजनिक सोलार वॉटर हिटर मार्फत मोफत गरम पाण्याची सुविधा.
23)शासकीय कर्मचार्यांकरिता बॉयोमेट्रीक हजेरी पद्धत.
24)ग्रामपंचायत मासिक जमा खर्च नोटीस बोर्डावर दरमहा प्रसिद्ध करण्यात येतो.
25)प्रत्येक घरातील मुख्य प्रवेशव्दारावर दुर्बीणची व्यवस्था.
26)नागरिकांनी कसे वागावे यासाठी गांवात जागोजागी माहिती पत्रक लावले आहेत.
27)ग्रामसेवक व संगणक परीचालकाला स्वतंत्र लॅपटॉप.
28)महिलासाठी मसाला गिरणी, दाल मिल, बटाटा वेपर्स मशीन, शेवई मशीन, पापड मशीन सुविधा उपलब्ध.
29)पाणी पुरवठा विद्युत पंप मोबाईल व्दारे चालू बंद सुविधा.
30)सॅनिटरी नॅपकिन डीस्पोझल मशीन सुविधा.
31)संपूर्ण गांव वाय फाय.
32)1 जानेवारी पासून कर भरणा करणाऱ्या खातेदारास बाजार मूल्यापेक्षा ५०% कमी दराने ट्रॅक्टरने शेतीची मशागत करून देतो.
33)मोफत शुद्ध तेल घाना.
34)15 कि.लो नी नागरिकांनकडून प्लास्टिक जमा करणे.
भविष्यात करावयाची नाविन्यपूर्ण कामे
1)अद्यायावत जि.प.शाळा.
2)जलतरंग तलाव व क्रीडांगण सुविधा.
3)संपूर्ण गांवासाठी चपाती मशीन सुविधा.
4)सौर उर्जेवर वीज निर्मित्ती
5)महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार निर्मित्ती.
6)गुणवंत विद्यार्थ्याना टॅप वाटप.