पाटोदा गावाची यशोगाथा


माझं गावचं मंदिर शोभलं !

“जिवा भावानं जव मी पाहीलं,माझ गावचं मंदिर शोभलं”या  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामविकासाची गोडवी गाणाऱ्या भजनातील प्रत्येक ओळीचे दर्शन पाटोदा ता.जि.औरंगाबादने घडविले आहे.औद्योगिकरणामुळे मेगासिटीची चाहुल लागलेल्या औरंगाबाद शहारापासुन अवघ्या १३ कि.मी.अंतरावर खामनदीच्या तिरावरील पाटोदा-गंगापुर नेहरी या जुळ्या गावांनी ग्रामविकासात उत्तुंग झेप घेतली आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाव्दारे २ ऑक्टोंबर २००५ रोजी गावात ग्रामोन्नतीची मुहुर्तमेढ घट्ट रोवण्यात आली,अन् अवघ्या ७ वर्षात गावाचे संपुर्ण स्वरुपच पालटले .निर्मलग्राम,पर्यावरण संतुलीत सम्रुध्द ग्राम या मानांकित पुरस्काराने महामहिम राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानीत होण्याचे भाग्य गावाला दोन वेळा प्राप्त झाले आहे.नुकताच आदर्शगाव पाटोदाला पंचायतीराज अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्कार (२०११-१२)मिळाल्याने गावकिर्तीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.सन २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे.

अधिक माहिती साठी

PATODA NIRMAL GRAM VIDEO